अर्ज कसा कराल?
महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाचा पर्याय दिसेल त्याला ओपन करायचे आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा सीएस्सी केंद्रावर संपर्क करावा.
आवश्यक कागदपत्रे
- बोअरवेलच्या लाभासाठी अर्जदाराचे आधारकार्ड जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- सात बारा व आठ-अ
- दारिद्रयरेषेचे कार्ड
- अर्जदाराचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
- पाणी उपलब्धतेचा दाखला (विहिरीसाठी)
- ०.४० हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला
- शेतात विहीर नसल्याचा दाखला
- ५०० फुटांच्या अंतरावर कुठचीही विहीर नसल्याचा दाखला (विहिरीसाठी)
- कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र
- संबंधित क्षेत्रातील गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र
- जागेचा फोटो
- ग्रामसभेचा ठराव आदी कागदपत्रे आवश्यक
- सदर कागदपत्रांची पूर्तता अर्ज मंजुरीनंतर करावी लागते.