आदिती

आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे, असं म्हटलं. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये जमा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.

राज्य सरकारनं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं मार्च महिन्याचा हप्ता लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे 24 तारखेदरम्यान महिलांना मिळाले होते. आता लाडक्या बहिणींना मार्चचे पैसे पहिल्या आठवड्यात मिळणार आहेत. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या पैशांसाठी मात्र त्यांना वाट पाहावी लागली.