काय आहे नवीन नियम

आता पुढील महिन्यापासून जन्म दाखल्याविषयी नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जन्म दाखल्याचे महत्व पुन्हा वाढणार आहे. 1 ऑक्टोबरपासून जन्म दाखल हेच एकमेव कागदपत्र वापरता येणार आहे. केंद्र सरकारने मान्सून सत्रात हे बिल मंजूर केले होते. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याची अधिसूचना काढली. हा नियम लागू झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही. जन्म दाखल हाच पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. जन्म दाखल्या आधाराचे तुमची कामे होतील. शाळेत प्रवेश, वाहतूक परवाना, पासपोर्ट आणि आधार कार्ड तयार करण्यासह इतर अनेक कामांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून जन्म दाखला सादर करावा लागेल. मुलांचा जन्म दाखला आई-वडिलांच्या आधार कार्डशी जोडण्यात येईल.