कंडक्टरने लगावली प्रवाशाच्या कानशिलात, बेस्ट बसमधील धक्कादायक VIDEO

Mumbai Best Bus Conductor Video : ही घटना मुंबईतील नेमक्या कोणत्या क्रमांकाच्या बसमध्ये घडली याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Mumbai Best Bus Conductor Video : अनेक मुंबईकर रोज ट्रेनप्रमाणे बेस्ट बसने प्रवास करतात; पण मुंबईत बेस्ट बसने प्रवास करताना कंडक्टरबरोबर प्रवाशांचे सुट्या पैशांवरून वा अन्य काही कारणांवरून वाद होतात. दरम्यान, सोशल मीडियावर एका भलत्याच कारणावरून प्रवासी आणि बेस्ट बस कंडक्टरमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले, ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

कोणत्या तरी कारणावरून प्रवासी आणि बस कंडक्टरमध्ये वाद झाला. त्यावेळी प्रवाशाने त्या वादाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यामुळे राग आल्यामुळे कंडक्टरने बडबड करीत थेट प्रवाशाच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना मुंबईतील बेस्ट बस क्रमांक A-382 मध्ये घडली आहे, ही बस अनुशक्ती नगरची आहे, अशी माहिती समोर आली आहे, मात्र, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कंडक्टरला प्रवाशावर हात उचलण्याचा अधिकार दिला कोणी, असा सवाल उपस्थित केला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद
व्हायरल व्हिडीओत प्रवासी आणि कंडक्टरमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याचे स्पष्ट दिसतेय. यावेळी कंडक्टर ‘तुला मी बसमधून उतर, असे बोलतच नाही, असे प्रवाशाला सुनावतो आणि बसच्या मागच्या दरवाजापर्यंत येताना दिसतो. यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करताना अन्य प्रवासी पण का उतरायचं, अशी कंडक्टरला वारंवार विचारणा करतो. यावेळी कंडक्टर काहीच उत्तर देत नाही म्हणून तो कंडक्टरला हात लावून पुन्हा तोच सवाल करतो. त्यावर कंडक्टर भडकतो आणि पुढच्याच क्षणी प्रवाशाच्या कानशिलात लगावतो. वर व्हिडीओ शूट करू नकोस, अशी धमकी देत मोबाईल ओढण्याचा प्रयत्न करतो. त्यावर अन्य प्रवासी मध्यस्थी करून कंडक्टरला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण, कंडक्टर काही शांत होत नाही. तो अन्य प्रवाशांनाच सांगतो की, तुम्हाला काय करायचं ते करा.

 

 

तिकीट असूनही कंडक्टर अशा प्रकारे प्रवाशांबरोबर उद्धट बोलत होता, असा खुलासा दुसरा प्रवासी करताना दिसतोय. त्यावरही कंडक्टर भडकतो आणि तो “बडबड करु नकोस शांत राहा’ असे ओरडून प्रवाशाला गप्प करण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला. तसेच, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे आणि मुंबई पोलीस यांना टॅगही केला. या पोस्टवर मुंबई पोलिसांनी उत्तर देत सांगितले, “संबंधित प्रवाशाने सर्वांत जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी”.

 

Leave a Comment