एलआयसीची विमा सखी (एमसीए योजना)
एलआयसीची विमा सखी (एमसीए योजना) ही केवळ महिलांसाठी असलेली एक स्टायपेंडरी योजना आहे, ज्याचा कालावधी ३ वर्षांचा आहे.
एमसीए योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये पगारी नियुक्ती म्हणून गणली जाणार नाही.
अर्ज केल्याच्या तारखेला किमान पूर्ण वय १८ वर्षे असावे. प्रवेशाच्या वेळी कमाल वय ७० वर्षे (शेवटचा वाढदिवस) असेल.
किमान पात्रता – १० वी उत्तीर्ण.