Pik Vima Policy

• तर पिक विमा संदर्भात वरील प्रश्नांसह इतर माहिती जाणून घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही.
• अगदी दोन मिनिटात आपल्या मोबाईलवर ही माहिती मिळवता येणार आहे.
• सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पीएम एफ बी वाय या योजनेचा चॅटबॉट क्रमांक 70655144 47 म्हणजेच मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे.
• हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हाट्सअपमध्ये येऊन PMFBY यावर यायचा आहे.
• जसे की आपण इतर वेळी व्हाट्सअप उघडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मेसेज करायचा असल्यास मेसेज बॉस उघडत असतो.
• त्याचप्रमाणे हा सेव केलेला नंबर व्हाट्सअप मध्ये उघडायचा आहे.
• त्यानंतर या नंबर वर Hi करून मेसेज पाठवायचा आहे.
• Hi करून मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला मेनूचा रिप्लाय येईल.
• यात पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स, पॉलिसी क्रॉप, लॉस इंटीमेशन, क्लेम स्टेटस, तिकीट स्टेटस, प्रीमियम कॅल्क्युलेटर असे पर्याय दिसतील.
• या पर्यायातील पॉलिसी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रब्बी 2024 आणि खरीप 2024 असे पर्याय दिसू लागतील.

• आपल्याला जर खरीप हंगामातील पीक विमा पॉलिसी पाहायचे असेल तर खरीप 2024 निवडल्यानंतर आपण भरलेल्या पॉलिसीचा नंबर, अर्जाचा नंबर, त्या पॉलिसीच्या गावाचं नाव, आपल्या भरलेल्या पिकाच नाव, सर्व्हे नंबर, भरलेली रक्कम, पिक विमा कंपनीचे नाव, भरलेला हप्ता, शासनाचा हप्ता, पॉलिसीची स्टेटस हि सर्व दिसू लागेल.

आता यापुढे आपणास इतर माहिती पाहायची असल्यास चालू ठेवण्यासाठी विचारले जाईल, त्यासाठी Yes या पर्यायावर क्लिक करा.
• जर आपल्याला यानंतर क्लेम स्टेटस पाहिजे असेल तर त्या पर्यायावर क्लिक करा. त्यात रब्बी 2024 ची खरीप 2024 यातील योग्य पर्याय निवडायचा आहे.
• यानंतर आपल्यासमोर अर्जाची स्थिती दाखवली जाईल, यात अर्जाचा क्रमांक असेल क्लेम स्टेटस असेल ही सर्व माहिती दिसून येईल.

अशा पद्धतीने आपण इतरही पिक विमा संदर्भातील बाबी संबंधित पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवू शकता.