नियम काय आहे?

 

लाभार्थ्यांकडे स्वतःच्या नावे शेतीचा सात-बारा उतारा असावा लागेल. त्यांना शेतात घरकुल बांधण्याची इच्छा असलेल्या लाभार्थ्यांना ही परवानगी दिली जाईल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित तलाठ्याद्वारे सात-बाऱ्यावर नोंद केली जाईल आणि गाव नमुना 8 मध्ये त्याची नोंद करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांची असेल.

नांदेड जिल्ह्यात यावर्षी 73 हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत मंजूर झालेल्या घरकुलांपैकी अनेक लाभार्थ्यांना जागेअभावी बांधकाम करण्यात अडचण आली आहे. उमरखेड, महागाव आणि पुसद तालुक्यांमध्ये जागेच्या समस्येचे प्रमाण जास्त असून इतर तालुक्यांमध्ये कमी असल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेकडून दिली गेली आहे.