Electric Vehicles Subsidy : भारत सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सब्सिडी दिली जाते. FAME आणि पीएम ई-ड्राइव योजना सुरु आहे. यात सब्सिडीच्या विषयावर वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची शुकवारी ऑटो कंपन्यांसोबत एक बैठक झाली.
जाणून घ्या कसे घ्यावे अनुदानसोबत गाडी
देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून अनेक वाहनांवर सब्सिडी दिली जाते. कंपन्यांना मिळणाऱ्या या सब्सिडीचा फायदा अखेर ग्राहकांना मिळतो. आधी सरकारने FAME योजनेच्या माध्यमातून ईवीवर सब्सिडी दिली. आता देशात पीएम E-Drive सब्सिडी योजना लागू सुरु आहे. पण ही सब्सिडी दीर्घकाळासाठी नसेल, असे सरकारकडून संकेत देण्यात आले आहेत.
जाणून घ्या कसे घ्यावे अनुदानसोबत गाडी
वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची शुकवारी ऑटो कंपन्यांसोबत एक बैठक झाली. बजेट आधीची ही चर्चा होती. या बैठकीत इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सरकारने विचारलं की, सध्याची सब्सिडी व्यवस्था बंद केली, तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का?. यावर ऑटो कंपन्यांनी सहमती दिली. विद्यमान सब्सिडी व्यवस्था संपल्यानंतर सब्सिडीची आवश्यकता भासणार नाही.