वडापाव विक्रेता महिन्याला किती पैसे कमावतो? दिवसाची कमाई ऐकून व्हाल चकित, पाहा Viral Video

viral video vada pav : वडापाव हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. महाराष्ट्रात प्रत्येक चौकात किंवा गल्लीत वडापाव विक्रेते पाहायला मिळतात. आपल्यापैकी अनेकजण आवडीने वडापाव खातत पण तुम्ही कधी विचार केला आहे का हे वडापाव विक्रेते महिन्याला किती पैसे कमवातात? असाच प्रश्न एका व्लॉगरलाही भेटला. सार्थक सचदेवा नावाच्या व्लॉगरने वडा पाव विक्रेत्याच्या मासिक कमाई जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपारिक नोकऱ्या आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता यांच्यातील उत्पन्नाच्या असमानतेवर प्रकाश टाकणारा सार्थक सचदेवाचा याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

 


सार्थक सचदेवा एका वडापाव विक्रेत्याच्या स्टॉलवर दिवसभर काम करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये वडापावस कसा तयार करायचा हे शिकला, दिवसभर वडपाव स्टॉलवर काम केले आणि वडपावाची विक्री केली. व्हायरल व्हिडीओमध्ये त्याने किती वडापाव विकले आणि दिवसभरात त्याने किती पैसे कमावले हे दाखवले आहे. व्हिडीओमध्ये सार्थक सांगतो की, “ आज मी एका दिवसात वडा पाव विकून किती पैसे कमवू शकतो ते पाहणार आहे. मी सकाळची सुरुवात निरीक्षण करून शिकून केली, नंतर गरमागरम वडा पाव बनवला.” स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होत असताना, वडापावला विशेषत: सकाळच्या वेळी जास्त मागणी असल्याचे दिसून आले.”

 

 

 


“एक वडा पावाची किंमत १५ रुपये आहे. अवघ्या अडीच तासामध्ये त्याने सुमारे २०० वडापाव विकले. दुपारच्या वेळी फारसे ग्राहक नव्हते पण संध्याकाळी ग्राहकांची गर्दी झाली होती. व्लॉगरचे दिवसभरात तब्बल ६२२ वडा पाव विकले. एका दिवसात, ते अंदाजे ९,३०० रुपये महिन्यासाठी, ते२,८०,००० रुपये आहे. खर्च वजा केल्यावर, दरमहा सुमारे २,००,००० रुपये आणि वर्षासाठी २४ लाख रुपये होतील.” अशी माहिती सार्थकने दिली. सार्थक सचदेवाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, सोशल मीडियावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया उमटत आहेत. कमेंटमध्ये दर्शकांनी त्यांचे आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केले viral video vada pav.

Leave a Comment