किती वाढणार पगार?
- जर एखाद्याचे मूळ वेतन 50 हजार रुपये असेल, तर 53% DA नुसार त्याला 26,500 रुपये महागाई भत्ता मिळेल. परंतु 55 टक्के DA नुसार त्याला 27,500 रुपये DA मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात एक हजार रुपयांची वाढ होणार आहे.
- जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन 70 हजार रुपये असेल. तर त्याच्या मूळ पगारावर महागाई भत्ता ₹ 37,100 असेल. परंतु 55 टक्के डीएनुसार, महागाई भत्ता ₹ 38,500 असेल. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात ₹1,400 ने वाढ होईल.
- मूळ वेतन ₹ 1,00,000 असलेल्यांना 53 टक्के डीए दराने ₹ 53,000 महागाई भत्ता मिळत असे, परंतु आता त्यांना 55 टक्के दराने ₹ 55,000 डीए मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात मासिक 2 हजार रुपयांची वाढ होणार आहे.
- यापूर्वी 3 ते 4 टक्के महागाई भत्ता वाढत होता. परंतु 78 महिन्यात पहिल्यांदाच महागाई भत्ता केवळ दोन टक्के वाढला आहे. यापू्रवी 2018 मध्ये महागाई भत्ता दोन टक्के वाढला होता. त्यानंतर सलग तीन ते चार टक्के महागाई भत्ता वाढला होता.