रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का

Shocking Video: आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत असतात.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कधी कॉमेडी, तर कधी डान्स व्हिडीओ, तसेच इन्फॉर्मेटिव्ह व बरेच क्राफ्ट व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकदा आपण लगेच स्क्रोल करतो; परंतु काही धक्कादायक व्हिडीओ कायम लक्षात राहतात.

आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो. सध्या असाच जीवघेणा स्टंट एका तरुणीने केलाय आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय केलंय या तरुणीने जाणून घेऊ या…

तरुणीचा स्टंट व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुणी अक्षरश: रेल्वे रुळावर झोपली आहे. हातात फोन घेऊन ती रेल्वे रुळामध्ये व्हिडीओ काढण्यासाठी हा स्टंट करताना दिसतेय. पटरीच्या मधोमध झोपून ती हा व्हिडीओ काढताना दिसतेय. तेवढ्यात एक भरधाव वेगात एक ट्रेन येते आणि या ट्रेनचा संपूर्ण व्हिडीओ ती Shocking Video रेकॉर्ड करते. दरम्यान, तरुणीने हा स्टंट नेमका कुठे केलाय हे अद्याप कळू शकले नाही.

Leave a Comment