Talking Crow Virl Video : तुम्ही आतापर्यंत पोपटाला बोलताना पाहिलं असेल. तीव्र स्मरणशक्तीसाठी ओळखला जाणारा पोपट ऐकलेल्या गोष्टी कधी विसरत नाही. तो अनेकदा व्यक्तींच्या आवाजाची नक्कलही करताना दिसतो.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पण, पोपटाप्रमाणे कावळ्याला तुम्ही माणसांप्रमाणे कधी बोलताना पाहिलं आहे का? होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण पालघर जिल्ह्यातील एका गावात चक्क माणसांप्रमाणे बोलणारा एक कावळा आता चर्चेत आला आहे. या बोलक्या कावळ्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पालघरमधील शहापूर तालुक्यातील गारगावं या ठिकाणी हा कावळा आढळून आला. या गावातील मंगल्या मुकणे यांच्या घरात हा माणसाळलेला कावळा राहतो. मुकणे यांना तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात त्यांच्या घराजवळ हा कावळा सापडला. यावेळी तो अवघ्या काही दिवसांचा होता.
कावळा चक्क आई, बाबा, काका, ताई अशी मारतो हाककावळा मारतोय काकांना हाक
व्हायरल व्हिडीओतही तुम्ही पाहू शकता की, हा कावळा एका घरातील बाकड्यावर बसून काका, काका अशी हाक मारतोय. पण, हाक देऊनही कोणतेही उत्तर न आल्याने तो प्रश्न विचारतोय की, काका कुठे आहेत? त्यामुळे हा बोलणारा कावळा आता चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. विशेष बाब म्हणजे तो घरातील व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांनाही अगदी नीट उत्तर देतो, त्यामुळे कावळ्याचं माणसांप्रमाणे बोलणं ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे.