सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार ७६ सेविकांची पदे Anganvadi bharti मंजूर असून त्यातील तीन हजार ९२५ पदे भरलेली आहेत. तर मदतनीस यांची चार हजार ७६ पदे मंजूर असून त्यातील ४१६ पदे रिक्त आहेत. पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागविले जाणार आहेत. सेविकांसाठी इयत्ता बारावी उत्तीर्णची अट आहे. दरम्यान, सोलापूरसह राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यांमधील सुमारे १० हजार पदे (सेविका व मदतनीस) २० मार्चपूर्वी भरली जाणार आहेत.