Crops insurance farmings आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पैसे जमा झालेले आहेत याची माहिती आपण आज पाहणार आहोत शेतकऱ्यांच्यासाठी पिक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे पिक विमा आता कोणाच्या खात्यावर कशाप्रकारे जमा होणार आहे आणि याबाबत मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे बघुयात संपूर्ण माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे आता पीक विम्याचे पैसे आपल्याला भेटणार आहेत राज्य सरकार क्षेत्राच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील असतो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे कारण भारतात सांगितलं होतं की जय जवान जय किसान आपल्या भारतातील शेतकरी भरपूर मेहनत करतात कष्ट करतात परंतु हवामान जर त्यांना साथ दिली नाही तर त्यांचा नुकसान देखील होत म्हणून सरकार राज्य सरकार त्यांच्या वेळोवेळी लक्ष देत असतात आता याच पीक विमा चे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळालेले आहेत याचीच माहिती आपण बघुयात.
Crops insurance farming शेतकरी खरिपातील पीकविम्याची वाट पाहत आहेत. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविल्याने २२ जिल्ह्यांमधील जवळपास २१६० कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला ७०० कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार आहे. कंपन्यांना विमा हप्ता मिळालयानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्या सुरुवात होईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. खरिप २०२४ मध्ये पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पुर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही ठिकाणी नुकसान वाईड स्प्रेडमध्ये गेले आहे. राज्यातील ५४ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही. त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची, याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आहे.
पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी Crops insurance farmings अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणे आवश्यक आहे. राज्याला जवळपास ७०० कोटींचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल. राज्य सरकार दोन दिवसांमध्ये विमा हप्ता देणार आहे, असे कृषी विभागाने सांगितले. तसेच काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भऱपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून २२ जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदूरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागूपर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.
या २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून १४५५ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ९६ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून ७०५ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली. सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधूनच भरपाई मिळणार आहे. काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भऱपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे Crops insurance farming.