Majhi Ladki Bahin Yojana Aditi tatkare महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही लाडक्या बहिणींमुळे पुन्हा आलो… पुन्हा आलो… पण याच लाडक्या बहिणींना निवडणूक प्रचारात जो 2100 रुपये देण्याचा शब्द महायुती सरकारने दिला होता त्याबाबत नेमकी काही घोषणा क;रण्यात आली की नाही याविषयी राज्यातील महिलांना उत्सुकता लागून राहिली आहे.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
‘आम्ही पुन्हा आलो… पुन्हा आलो…’
अर्थसंकल्पाची सुरुवात करतानाच अजित पवार म्हणाले की, ‘लाडक्या बहिणी मिळाल्या अन् आम्ही धन्य झालो, बारा कोटी प्रियजनांना मान्य झालो. विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो… पुन्हा आलो…’ अजितदादांच्या याच खणखणीत सुरुवातीमुळे ते पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी काही खास आणि मोठी घोषणा करणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
आपल्या भाषणात अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या निधीचा उल्लेख केला. पण निवडणूक प्रचारात जी गोष्ट जाहिरनाम्यात छापण्यात आली होती त्याची कुठेही घोषणा यावेळी करण्यात आली नाही.
लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय अजित पवार
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 2025-26 मध्ये या योजनेकरिता 36 हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला बचत गटांनी आर्थिक उपक्रमासाठी भांडवल केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचं आमच्या विचाराधीन आहे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
2100 रुपये मिळणार नाहीच?
राज्यातील महिलांना 2100 रुपये देऊ असं महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात सांगितेलेलं. पण त्यांना हे 2100 रुपये कधी देणार याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. किंबहुना याविषयी एकही विधान अजित पवार यांनी आजच्या (10 मार्च 2025) अर्थसंकल्पात केलेलं नाही. दरम्यान, यावरुन विरोधकांनी मात्र टीका करणं सुरू केलं आहे.
लाभार्थी यादी मधून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे
महिलांसाठी अर्थसंकल्पात इतरही घोषणा
महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उज्ज्वला महिला उद्योजकता योजना’ सुरू करण्यात Majhi Ladki Bahin Yojana Aditi tatkare आली आहे, ज्यासाठी १,००० कोटी रुपयांची तरतूद आहे. महिला सुरक्षेसाठी विशेष पोलिस दलाची स्थापना आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षा उपाययोजना बळकट करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे.