Namo Shetkari Yojana Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. आता 20 व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.
नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा?
महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचे 2 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या 19 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष 20 व्या हफ्त्याकडे लागलेलं आहे. 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये फेब्रुवारी महिन्यातील 24 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. Namo Shetkari Yojana Installment
नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना होत आहे. छोट्या शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येक वर्षात 6000 रुपयांची रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. पीएम किसान सन्मान निधीचे 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 38000 रुपये मिळाले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे भारत सरकारनं आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्त्यांची रक्कम जमा केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करण्यात आले. तो हप्ता जारी करुन आतापर्यंत एक महिना झालेला आहे. शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी वर्ग केला जातो. त्यामुळं आता पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जून महिन्यात वर्ग करण्यात येऊ शकतो. मात्र, सरकारकडून या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पीएम किसानचे हप्ते मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक असतं. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर जाऊन प्रथम ई केवायसी करणं देखील गरजेचं असतं. ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर 2000 रुपये मिळत नाहीत. याशिवाय जमीन पडताळणी करुन घेणं देखील असणं आवश्यक असतं. पीएम किसानच्या रेकॉर्डमध्ये आधार कार्ड लिंक असलेलं आणि डीबीटी पर्याय सक्रीय असणारं बँक खातं असल्यास हप्त्यांची रक्कम जमा होण्यात कोणतीही अडचण येत नाही.
नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा?
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत 6 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून एका आर्थिक वर्षात 12000 हजार रुपये मिळतात. महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांसाठी चांगली बातमी आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत 2,169 रु कोटींची मदत जाहीर केली आहे. 31 मार्च 2025 पूर्वी ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आले होते. मग आता हे पैसे बँक खात्यावर जमा झाले आहेत की नाही? हे तुम्हाला मोबईलद्वारे 5 मिनिटांत चेक करता येणार आहे.
मोबाईलवरून तुमचा हप्ता कसा तपासाल?स्टेप 1: अधिकृत वेबसाइट https://nsmny.mahait.org/ वर जा. स्टेप 2: “Beneficiary Status” बटणावर क्लिक करा. स्टेप 3: आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक भरा आणि कॅप्चा टाका. स्टेप 4: OTP एंटर करा आणि “Get Data” क्लिक करा. स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल.
योजना वेळेत राबवली जावी म्हणून सरकारने सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री दिली आहे. जर कोणाचा हप्ता मिळाला नसेल, तर बँक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.