IPL 2025 : हार्दिक पांड्याला डच्चू, रोहितच्या या लाडक्याला मिळाली ‘Mumbai Indians’ ची कॅप्टन्सी!

Rohit Sharma Hardik Pandya : मुंबई इंडियन्स येत्या 23 मार्चपासून आयपीएल मोहिमेला सुरूवात करेल. मात्र, सलामीच्या सामन्यात हार्दिक पांड्या नाही तर रोहितला लाडका खेळाडू कॅप्टन असणार आहे.

MI vs CSK, IPL 2025 : येत्या २३ मार्चपासून आयपीएलच्या २०२४ पर्वाला सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण असेल, याविषयी बरीच चर्चा रंगली होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या याच्यावर बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटमुळे बंदी घातल्यामुळे, सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे.

सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार Rohit Sharma Hardik Pandya:

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करेल, असं खुद्द हार्दिक पांड्याने एका कार्यक्रमात सांगितलं आहे.
चेपॉक येथे चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्सला दोन मोठ्या स्टार्सची उणीव भासेल. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या चेन्नईविरुद्ध खेळणार नाहीत.

 

➡️ IPL 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर पहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक

 

हार्दिक पांड्या काय म्हणाला?

“मी भाग्यवान आहे की माझ्यासोबत तीन कर्णधार खेळत आहेत – रोहित, सूर्या आणि बुमराह… ते नेहमीच माझ्या खांद्याभोवती हात ठेवतात आणि जेव्हा मला कोणत्याही मदतीची आवश्यकता असते तेव्हा ते तिथे असतात,” असं हार्दिक पांड्या म्हणाला.

हार्दिक पांड्यावर कारवाई का?

  • मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला स्लो ओव्हर रेटमुळे बंदीला सामोरं जावं लागणार आहे.
  • गेल्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात वेळेत हार्दिकला ओव्हर पूर्ण करून घेता आली नव्हती.
  • ठरावीक वेळेत मुंबईने ओव्हर पूर्ण(Rohit Sharma Hardik Pandya) न केल्याने आता हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी घातली गेली आहे. त्यामुळे सूर्याला पहिल्या
  • सामन्यात कर्णधार करण्यात आलं आहे.

 

➡️ IPL 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर पहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक

 

 

बीसीसीआयचा नियम काय?
  • मॅचमध्ये ओव्हर रेटचं उल्लंघन केल्यामुळे पहिल्यांदाच १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.
  • दुसऱ्या ओव्हर रेटच्या उल्लंघनासाठी कर्णधाराला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात येतो.
  • त्यानंतर देखील कर्णधाराकडून चूक झाली तर एका सामन्याची बंदी घालण्यात येते. तसेच ३० लाखांचा दंड देखील ठोठावण्या येतो.
  • पण आता बीसीसीआयने नियमात बदल केले आहेत. आता स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधाराला डिमेरिट पॉईंट्स दिले जाणार आहेत.
  • या सर्व घडामोडींमुळे, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना अधिकच रोमांचक होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबई
  • इंडियन्स कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Comment