“रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

Viral Ukhana Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणताही शुभ प्रसंग किंवा लग्न समारंभ आवडीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा विचारला जातो.

पूर्वी फक्त स्त्रिया उखाणा घ्याय्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा उखाणे घेतात. खरं तर लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा घेतला जातो. सध्या तरुण मंडळी उखाण्यामध्ये खूप क्रिएटिव्ही दाखवतात आणि हटके उखाणे घेण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नुकतेच लग्न झालेले नवरी आणि नवरदेव उखाणा घेताना दिसत आहे. नवरी आणि नवरदेवाने भन्नाट असा उखाणा घेतला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नुकतेच लग्न झालेले जोडपे दिसेल. या जोडप्यांना उखाणा घेण्यास विचारतात तेव्हा हे अतिशय सुंदररित्या उखाणा घेताना दिसतात. त्यांच्या आजुबाजूला नातेवाईक, कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार घोळका करून उभे असतात. सुरुवातीला नवरी उखाणा घेताना म्हणते,
“रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम.
प्रेमाशी जोडले एका नामाशी दुसरे नाम
त्या प्रेमकथामध्ये जोडली आज एक गोष्ट
पटना आणि महाराष्ट्र दोन्ही म्हणताहेत
वैदही आणि उपांशूची जोडी मस्त”

smittencurve या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी एकच उखाणा लिहिला होता कारण मला माहित आहे की मी खूप जिंकू शकत नाही. आम्ही लग्नानंतर हळदीचा धागा सोडल्यावर उखाणा घेतला. महाराष्ट्रीयन परंपरा होती त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन नव्हतं पण उपांशूने त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी प्रामाणिक राहत उखाणा घेतला. महाराष्ट्रीयन विवाहसोहळ्यात स्त्रिया पतीचे नाव घेत नाही पण उखाणा हा अप्रत्यक्षपणे लयद्वारे पतीचे नाव घेण्याचा एक काव्यात्मक मार्ग असतो. हा एक गोड विधी आहे जो लग्नानंतर पार पाडला जातो. विशेषत: लग्नानंतर किंवा नवीन घरात प्रवेश करताना किंवा तुमचे पहिले जेवण एकत्र करताना उखाणा घेण्याची परंपरा आहे.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर उखाणा” अनेक युजर्सना हा उखाण्याचा व्हिडीओ खूप आवडला Viral Ukhana Video.

Leave a Comment